इंडेक्स फंड आणि ETF
इंडेक्स फंड आणि ETF मध्ये मॅनेजर शेअर्स निवडत नाही; ते फक्त Nifty 50 किंवा Sensex सारख्या मार्केट इंडेक्सची हुबेहूब नक्कल करतात. त्यामुळे त्यांचा एक्स्पेन्स रेशो कमी राहतो.
इंडेक्स फंडाची खरेदी-विक्री इतर म्युच्युअल फंडांसारखीच फंड हाऊसमार्फत त्या दिवसाच्या NAV वर होते, आणि त्यात SIP करता येते. ETF ची खरेदी-विक्री शेअरसारखी स्टॉक एक्सचेंजवर बाजाराच्या वेळेत होते आणि त्यासाठी डीमॅट खाते लागते.
एकाच इंडेक्सचा मागोवा घेणाऱ्या फंडांमध्ये, कमी एक्स्पेन्स रेशो आणि कमी ट्रॅकिंग डिफरन्स असलेला फंड चांगला.
अपडेट: